हायवेवरील ढाब्यांवर अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह….!!
मौदा : तालुक्यातील भंडारा–मौदा हायवेवरील ढाब्यांवर अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोरगाव ते टोलनाका या दरम्यान असलेल्या काही ढाब्यांवर रोज सर्रासपणे दारू विक्री, बोरगाव महादुला धाब्यावर डिझेल तस्करी पेट्रोल तस्करी होत असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले आहे. मौदा पोलिसांना लक्ष्मी दर्शनाचा होत असतो. या मार्गावरून जनावरांची तस्करी मोठ्या जोमात सुरू असतो. विशेष म्हणजे, या प्रकाराकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हायवेवरील या ढाब्यांवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची वर्दळ असते. या ठिकाणी नियमांना डावलून खुलेआम दारू विक्री केली जाते. यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक रहिवाशांनी याबाबत अनेकदा तक्रारी केल्याचे सांगितले जात असले, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली दिसून येत नाही.
या संपूर्ण प्रकारात संबंधित पोलिस ठाण्याच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही नागरिकांच्या मते, या अवैध धंद्यांना पोलिसांचा मूक आशीर्वाद असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर विक्री होणे शक्य नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपूर जिल्हा ग्रामीणचे अक्षम्य दुर्लक्ष. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही या प्रकाराचा त्रास सहन करावा लागत आहे. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रकार वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, नागपूर विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून अवैध दारू विक्रीवर आळा घालावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
