भंडारा-नागपूर मार्गावर मौदा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश वाहतूक रोखली, ११ जनावरांची सुटका

भंडारा-नागपूर मार्गावर मौदा पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गोवंश वाहतूक रोखली, ११ जनावरांची सुटका

मौदा:

भंडारा ते नागपूर मार्गे अवैधरित्या कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ११ गोवंश जनावरांची मौदा पोलिसांनी यशस्वीरित्या सुटका केली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ७ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मे २०२६ रोजी मौदा पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एका बोलेरो पिकअपमधून जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बोरगाव चेकपोस्टवर नाकाबंदी केली. दरम्यान, बोलेरो पिकअप (क्र. MH 40 CD 1375) थांबवून तपासणी केली असता, त्यात ११ गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबलेली आढळली.

या कारवाईत पोलिसांनी चालक शुभम अनिल आंबेडारे (२३, रा. भिल्लेवाडा, जि. भंडारा) आणि अश्पाक सज्जाद खान (२९, रा. चंगेरा, जि. गोंदिया) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचे वाहन आणि १ लाख १० हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ७.१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *