प्रवासात महिलेची प्रकृती बिघडली; महागाव पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने महिला सुखरूप; 

प्रवासात महिलेची प्रकृती बिघडली; महागाव पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने महिला सुखरूप;

 

 

यवतमाळ प्रतिनिधी : एस. के. शब्बीर

 

 

महागाव पोलीस प्रशासनाने पुन्हा एकदा कर्तव्यदक्षतेसोबतच मानवतेचे दर्शन घडवत प्रवासादरम्यान अचानक प्रकृती बिघडलेल्या एका महिलेला तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देत संभाव्य अनर्थ टाळला.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर नियमित पेट्रोलिंग करत असताना महागाव पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार ए.पी.आय सुनील आंबूरे यांना भिसे पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्स बसजवळ मोठी गर्दी दिसून आली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चौकशी केली.

यावेळी ट्रॅव्हल्स बसमधील प्रवासी गुलरान अल्ताफ शेख वय ३२, रा. सोलापूर) यांना प्रवासादरम्यान अचानक तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याचे समोर आले. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात येताच ए.पी.आय सुनील आंबूरे यांनी कोणताही वेळ न दवडता पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित महिला व त्यांचे मामा शेख शरीफ यांना तातडीने महागाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना महागाव शहरातील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तेथे आवश्यक उपचार पूर्ण झाल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर त्यांना सुखरूप पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

या संपूर्ण घटनेत महागाव पोलिसांनी दाखविलेली तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतावादी भूमिका सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे. संकटाच्या क्षणी पोलिसांनी दिलेल्या त्वरित मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना प्रवासी महिलेच्या नातेवाईकांनी

महागाव पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानत, वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाल्याचे सांगितले.व

महागाव पोलिसांच्या या कार्यामुळे “पोलीस हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकटसमयी धावून येणारे खरे आधारवड आहेत,”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *