*सोनम वांगचुक यांचे उपोषण सरकारने सोडवावे यासाठी निवेदन देण्यात येणार….*
प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते तथा रेमन मैग्सेसे पुरस्कारप्राप्त *सोनम वांगचूक* हे देशातील ‘NEET’ (वैद्यकीय प्रवेश परीक्षा) परीक्षा घोटाळा, पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत.
17 दिवस उलटले तरी सरकार असंवेदनशीलता दाखवत आहे. सरकारने संवेदनशीलता दर्शवीत सोनम वांगचुक यांचे उपोषण सोडवण्याचे प्रयत्न करावेत यासाठी मा. पंतप्रधान यांना निवेदन देण्यात येणार आहे. यावेळी आपल्यासारख्या संस्था, संघटना, पक्ष, विद्यार्थी, पालक व नागरिक यांनी एकत्रित येणे आवश्यक आहे.
आपण संवेदनशील आहात. मग यायलाच हवे.
दि. 17 जुलै 2026
वार – शुक्रवार
वेळ – दुपारी 12.30
स्थळ – विभागीय अधिकारी कार्यालय,
वसमत.
विनीत
आंतरभारती, वसमत.
संवाद समूह, वसमत.
नागेश चव्हाण
प्रतिनिधी सचिन घारपुरे
