रामटेकमध्ये उद्या काँग्रेसचा भव्य ‘शेतकरी जन आक्रोश मोर्चा’; विविध मागण्यांसाठी पेटणार संघर्ष….!!

रामटेकमध्ये उद्या काँग्रेसचा भव्य ‘शेतकरी जन आक्रोश मोर्चा’; विविध मागण्यांसाठी पेटणार संघर्ष….!!

रामटेक:शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या, शुक्रवार दिनांक ७ ऑगस्ट २०२६ रोजी रामटेक येथे एका भव्य ‘शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे’ आयोजन करण्यात आले आहे. माजी राज्मंत्री राजेन्द्रजी मुळक, माजी आमदार सुनिलबाबु केदार, रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार श्यामकुमार बर्वे यांचे नेतृत्वात माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा मोर्चा निघणार असून, यामध्ये परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.येथून दिनांक.०७/०८/२०२६ रोजी उद्या सकाळी ११:०० वाजता श्री लंबे हनुमान मंदिर येथून सुरू होईल. तिथून घोषणाबाजी करत हा मोर्चा एस.डी.ओ. (SDO) कार्यालय, रामटेक येथे पोहोचेल. तिथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले जाईल.मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:धान बोनस: धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५०,००० रुपये बोनस देण्यात यावा.कर्जमाफी व विमा: शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी आणि पीकविम्याचा लाभ मिळावा.वीज पुरवठा: शेतीसाठी २४ तास अखंडित वीज पुरवली जावी.दरवाढ नियंत्रण: बी-बियाणे, खते, फर्टिलायझर, कीटकनाशके आणि डिझेलवरील लिंकिंग बंद करून वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवावे.वन्यजीवांचा त्रास: जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात.भूसंपादन न्याय: नव्याने प्रस्थापित आऊटर रिंग रोडमध्ये ज्या शेतकऱ्यांची भूमी अधिग्रहित झाली आहे, त्यांना योग्य न्याय आणि मोबदला मिळावा.”शेतकऱ्यांचा न्याय, हाच आमचा ध्यास!” आणि “शेतकरी एकजुटीचा, लढा हक्काचा!” असा नारा देत काँग्रेसने या मोर्चामध्ये रामटेक परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

नागपुर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *