ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पांडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

 

नांदेड | प्रतिनिधी – ओमकार पोतलवाड

 

नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब पांडे यांचा वाढदिवसानिमित्त श्री शंकरराव चव्हाण हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाच्या वतीने त्यांचा शाल, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. आपल्या परखड, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेतून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली असून, त्यांचे कार्य प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांनी सांगितले. वाढदिवसानिमित्त उपस्थित शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी श्री. पांडे यांना निरोगी, दीर्घायुष्य व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

 

प्रतिनिधी – ओमकार पोतलवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *