दोन दुचाकीत टक्कर . मनसर येथील युवकाचा मृत्यु .मनसर च्या मोक्षधाम समोर 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनी दोन दुचाकी वाहनात झालेल्या आमनेसामने टक्करीत एक दुचाकी चालक गंभीर जख्मी झाल्याने त्याला उपचारार्थ दवाखान्यात नेले असता त्याचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे .
नागपूर -जबलपूर महामार्गावर असलेल्या मनसर जवळील वार्ड क्र 3 भट्टा निवासी ऋषी अजय पाटील वय 28 वर्ष हा 15 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान मनसर वरून सर्व्हिस मार्गाने घरी येत असतांना कांद्री वरून मनसर ला जाणाऱ्या एका दुचाकी शी मनसर च्या मोक्षधाम समोर झालेल्या आमोरासमोर धडकेत ऋषी अजय पाटील हा जबर जख्मी झाला .
त्याला जख्मी अवस्थेत उपचारार्थ दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले .
मिलनसार स्वभाव असलेला ,सामाजीक व सांस्कृतिक कार्यक्रमात सदैव तत्पर भाग घेणाऱ्या युवकावर 15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनी काळाने घात घातल्याने मनसर परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे .
रामटेक पोलीसांनी घटनेची नोंद केली असून पूढिल तपास रामटेक पोलीस करीत आहेत .
सिटी इंडिया न्युज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम
