भाग्यश्री मोहिते यांचे कीर्तन 

भाग्यश्री मोहिते यांचे कीर्तन

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली तालुक्यातील साटंबा येथे दिनांक 25 ऑगस्ट रोजी हभप भाग्यश्री मोहिते यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ह भ प भाग्यश्री मोहिते यांनी समता बंधुभाव एकात्मता तसेच आई-वडिलांची सेवा शिक्षणाचे महत्त्व वृक्ष संवर्धन व्यसनमुक्ती या विषयावर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून विशद केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायत्री मुळे यांनी ह भ प भाग्यश्री मोहिते चा सत्कार केला. यावेळी माधव घ्यार पुंजाजी मुळे, परसराम मुळे, परमेश्वर मांडगे यांच्यासह भाविक भक्त महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *