*न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथे प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी*
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा संचलित न्यू माॅडेल डिग्री काॅलेज हिंगोली येथे आज दिनांक 17 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
यांची 141 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉ. एन. एस. सोळंके सर होते. त्यांच्या हस्ते प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी प्रा. डॉ. अतिश कदम यांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकला. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे
यांच्या 141 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
उपस्थित सर्वांनी प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना अभिवादन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी आदरणीय प्राचार्य डॉ. एन. एस. सोळंके, प्रा. डॉ. ए. एम. कदम, डॉ. एस. आर. काळबांडे, डॉ. सुभाष मापारी, प्रा. बी. बी. चव्हाण, डॉ. संभाजी चौतमाल, डॉ. वाय. एम. काशिदे, डॉ. लक्ष्मी गलंडे, प्रा. स्नेहा शिर्के, प्रा. उषा किरवले, डॉ. सिद्धार्थ खंदारे, प्रा. गौरव गोरे, प्रा. विजय कांबळे, प्रा. गोपाल जाधव, प्रा. एस. ए. चव्हाण, प्रा. जुनेद शेख
तसेच श्री. गजानन शिंदे, श्री. संभाजी चौधरी, श्री. राजेंद्र केदारे, श्री. गजानन कऱ्हाळे, श्री. आशिष पतंगे, श्री. किरण लोडे, श्री. पाशुभाई सय्यद, श्री. शेरु सय्यद, श्री. महेंद्र दिपके विद्यार्थ्यी व विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
