जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यावरण पुरक ई – बससेवा सुरु करा, परिवाहन मंत्र्यांना निवेदन —-
सायगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे
सोयगांव दि.२७– जगप्रसिद्ध अजिंठा लेणी बघण्यासाठी देश – विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. टि पॉइन्ट ते लेणी पर्यटकांना येणे – जाण्यासाठी प्रदुषण विरहित बस सेवा अवशक्य असतांना परिवहन मंडळाच्या वतीने साधी बस सेवा सुरु आहे. या संदर्भात भाजप युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन अजिंठा लेण्यांत प्रदुषण विरहित ई बससेवा ( शिवाई बससेवा ) सुरु करण्यात यावी. बस चे चार्जिंग स्टेशन सोयगांव बस आगारात उभारण्यात यावे. सोयगांव बस आगाराची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. नवीन बस स्थानक उभारण्यात यावे, तसेच सुरत , कल्याण, अकोला, परभणी, नंदुरबार ही लांब पल्याची बस सेवा सोयगांव आगाराच्या वतीने चालविण्यात यावी, सोयगांव आगाराला नविन बस गाड्या देण्यात यावे तसेच छत्रपती संभाजीनगर ते जळगाव मार्गावर चालविण्यात येणाऱ्या शिवाई बसला फर्दापूर, अजिंठा लेणी या स्टॉपवर थांबा नाही त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्याबद्दल सविस्तर चर्चा करून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना भाजप युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील यांनी निवेदन दिले.
