बीड-गणेशपूर जिल्हा परिषद शाळेत सहा नवीन वर्गखोल्या व स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढाकार

*बीड-गणेशपूर जिल्हा परिषद शाळेत सहा नवीन वर्गखोल्या व स्वच्छतागृह उभारणीसाठी पुढाकार*

 

*टाकळघाट ग्रामपंचायतीअंतर्गत शाळेच्या विकासासाठी ब्रीज द गॅप फाउंडेशनची बैठक*

 

*टाकळघाट :* ग्रामपंचायत टाकळघाटअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, बीड-गणेशपूर येथे सहा नवीन वर्गखोल्या तसेच सुलभ स्वच्छतागृहाच्या बांधकामाच्या दृष्टीने ब्रीज द गॅप फाउंडेशनच्या वतीने पाहणी व माहिती संकलनासाठी बैठक आयोजित करण्यात आली.

 

शाळेतील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच स्वच्छतागृहाची सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने संबंधित ठिकाणाची माहिती घेऊन पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

 

या बैठकीला ग्रामपंचायत *टाकळघाटच्या सरपंच शारदा शिंगारे, ग्रामपंचायत अधिकारी सुहासिनी कोल्हे, जिल्हा परिषद* *शाळेचे मुख्याध्यापक श्रीरामे सर, ब्रीज द गॅप फाउंडेशनचे अधिकारी व शिक्षक उपस्थित होते.* शाळेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक माहिती संकलित करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

 

विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळणे आवश्यक असून, या उपक्रमातून शाळेच्या विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रस्तावित बांधकामाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि त्याची सद्यस्थिती याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होऊ शकतील.

 

*रिपोर्टर : जयश्री चव्हाण*

*सी टी इंडिया न्यूज*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *