समूह नृत्यात शांताबाई दराडे विद्यालयाची दिमाखदार कामगिरी;
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली सार्वजनिक दसरा महोत्सवात द्वितीय क्रमांक:
भारतीय विद्या मंदिर शिक्षण संस्था संचलित श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालय हिंगोली येथील विद्यार्थिनींनी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती द्वारा आयोजित समूह नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. कार्यक्रमाचे आयोजन हॉटेल शिवलीला
सेलिब्रेशन्स येथे करण्यात आले होते. रोख रक्कम पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह देऊन संघाचा सत्कार करण्यात आला. समूह स्पर्धेत महाभारतातील एक नृत्य सादर करण्यात आले. यामध्ये रुद्विका विनोद घुगे, तन्वी बाळू गव्हाणे, आराध्या सुभाष जरे, श्रावणी गजानन मारकड, नम्रता सागर वैद्य, स्वरा राहुल साखरेकर, धनश्री संजय गुठ्ठे, आरुषी बालाजी पालवे, अंकिता नारायण राऊत, तनिष्का मुरलीधर राऊत, वंशिका ज्ञानेश्वर निरगुडे, हर्षदा वामन कुगावकर, श्रद्धा विठ्ठल साळेगावकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. सर्व संघाला अध्यापक संजय गुठ्ठे, श्रीमती संगीता जाधव व श्रीमती शोभा कल्याने यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विद्यार्थिनींचा व मार्गदर्शक अध्यापक यांचा शाळेत मुख्याध्यापक डॉ. प्रकाश अंभोरे व उपमुख्याध्यापक श्री. अनिल लोळेवार यांनी पुष्पहार घालून सत्कार केला. सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ज्येष्ठ अध्यापक संजय कुलकर्णी यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. मदन मार्डीकर, सचिव ॲड गयबाराव नाईक व सर्व सन्माननीय संचालक यांनी सर्व संघाचे व मार्गदर्शक अध्यापक महोदयांचे अभिनंदन केले.
