जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता! इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून ठाणा व वरखेडी खुर्द येथे

जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता! इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून ठाणा व वरखेडी खुर्द येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण

 

 

 

सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

 

सोयगाव : जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून सोयगाव तालुक्यातील ठाणा व वरखेडी खुर्द या दोन्ही गावांमध्ये महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. निवडणुकीदरम्यान ग्रामस्थांना दिलेला शब्द प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण झाल्याने दोन्ही गावांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा महान विचार दिला. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीला त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ठाणा व वरखेडी खुर्द येथील ग्रामस्थांनी पुतळा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार इद्रीस मुलतानी यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आणि दोन्ही गावांतील पुतळ्यांचे अनावरण प्रत्यक्षात साकार झाले.

 

या दोन्ही गावांमध्ये आयु. भंते बोधिधम्मा यांच्या उपस्थितीत व ग्रामस्थांच्या सहभागातून पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशजी बनकर, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, सभापती उत्तम चव्हाण, बनेखा पठाण, उपसभापती भगवान आहेर, संजय पाटील, शिवाजीराव बुढाळ, अशोकदादा तायडे, अनिल खरात, संजीवन सोनवणे, किशोर जगताप, जयप्रकाश चव्हाण, गजानन पवार, अमित आरके, अतुल साळवे, सचिन शिंदे, समाधान बावस्कर, संदीप मानकर, योगेश शिंदे, सूरज कवाल,भीमा बोराडे, संजय दामोदर, राहुल दामोदर,उस्मान शेख, विलास आगळे, सागर बिरारे, प्रकाश शिंदे, राजू रेकनोत,वसंत चव्हाण,सचिन शिंदे यांच्यासह दोन्ही गावातील ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्णमानव जातीसाठी प्रेरणादायी आहेत. ठाणा व वरखेडी खुर्द येथीलग्रामस्थांना जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी दिलेला शब्द पूर्ण करता आला याचे मनापासून समाधान आहे. जनतेची सेवा हेच आमचे ध्येय असून, जनसामान्यांना कोणत्याही अडचणीच्या वेळी, कोणत्याही कामासाठी अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा एक फोन करा, आम्ही आपल्या सेवेसाठी सदैव हजर आहोत इद्रीस मुलतानीमुस्लिम पासमांदा समाज अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (राज्यमंत्री दर्जा) तथा भाजपा अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष*

 

*ठाणा व वरखेडी खुर्द येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची इद्रीस मुलतानी यांनी पुढाकार घेऊन पूर्तता केली, ही कौतुकास्पद बाब आहे. सोयगाव तालुक्यात जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांचे सातत्याने सुरू असलेले प्रयत्न व कामाची गती सोयगाव तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहेत श्री. सुरेशजी बनकर जिल्हाध्यक्ष, भाजपा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष*

 

*ठाणा व वरखेडी खुर्द येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे अनावरण होणे ही दोन्ही गावांसाठी अभिमानाची बाब आहे. ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनाचीपूर्तताकेल्याबद्दल इद्रीस मुलतानी यांचे मनःपूर्वक अभिनंदन. या पुतळ्यांमधून पुढील पिढ्यांना बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा मिळत राहील.”बनेखा पठाण*

 

निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासने केवळ शब्दांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण करण्याचा प्रयत्न इद्रीस मुलतानी यांच्या पुढाकारातून करण्यात आला आहे. ठाणा आणि वरखेडी खुर्द या दोन्ही गावांमध्ये बाबासाहेबांचे पुतळे उभारून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. या उपक्रमामुळे दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजाच्या आचरणात उतरवणे आणि समता, बंधुता व सामाजिक न्यायाचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *