दहशतवाद विरोधी शाखा भंडारा नी साधला पवनी पोलीस स्टेशन

दहशतवाद विरोधी शाखा भंडारा नी साधला पवनी पोलीस स्टेशन हदीतील अवैध रेती माफियांवर निशाणा….!!

 

पवनी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा कुंभकर्णी झोपेत….!!

 

भंडारा:- दि.13 मार्च 2026 रोजी दहशतवाद विरोधी शाखा भंडारा यांचे पथक पवनी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती माफियांवर कारवाई करिता पेट्रोलिंग करीत असताना नीलज फाटा येथे थांबले असता चंद्रपूर कडून दोन टिप्पर येताना दिसले असता त्या दोन टिप्पर चालकांना रेती वाहतुकीच्या परवाना विचारले असता तेथील टीप्पर मध्ये चार ब्रास रेती चाच परवाना असून 5 ब्रास रेती अतिरिक्त असल्याचे आढळुन आले.व टिप्पर क्रमांक एम एच 40 सिटी 22 96 चा मालक श्री राहुल रमेश थेरे वय 31 वर्ष, एम.एच 40 बी.एफ 9696 चा मालक चालक महेश माधवराव पंचभाई वय 29 वर्ष रा. वलनी. तालुका पवनी, जिल्हा भंडारा दोन्ही राहणार वलनी. एम एच 40 सिटी 22 96 या क्रमांकाचे अंदाजे किंमत 50,00,000/- रुपये असलेले रेती 9 ब्रास 54,000/- हजार रुपये, टिप्पर क्रमांक 2) एम एच 40 बीएफ 96 96 चे अंदाजे किंमत 50,00,000/- रुपये,व डाल्या मध्ये असलेली 9 ब्रास रेती किंमत 54,000/- हजार रुपये असा एकूण 1,01,08,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहनात 4 ब्रास रेतीचा परवाना घेवून अतिरिक्त वीणा परवाना अंदाजे एक ब्रास रेती किंमत 6000/- हजार रुपये असा एकूण 30,000/- हजार रुपये,तर दोन्ही टिप्पर मध्ये अंदाजे किंमत 60,000/- रुपये शासनाचा मालकीची रेती अवैध रित्या विना पास परवाना चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने फिर्यादी चे लेखी रिपोर्ट वरून मा.पोलीस निरीक्षक साहेब यांचे आदेशाने पवनी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनाच का म्हणून दिसत नाही.या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येतो.

ही कारवाही मा.पोलीस आधीक्षक श्री.नुरुल हसन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.निलेश मोरे साहेब,सहायक पोलिस निरीक्षक श्री.गणेश बैरागी दहशतवाद विरोधी पथक भंडारा,यांचे मार्गदर्शनात पोलीस शिपाई सरवरे दहशतवाद शाखा भंडारा,यांनी केली असून पुढील तपास पवनी पोलीस अधिकारी करीत आहेत…

भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *