*गौरीष फॅशन इन्स्टिट्यूट व जगदंब असोसिएट्स प्रस्तुत ‘फॅशन रनवे 2026’ उत्साहात संपन्न*
प्रतिनिधी – *संदिप पांचाळ*
गौरीष फॅशन इन्स्टिट्यूट व जगदंब असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फॅशन रनवे 2026’ हा आकर्षक फॅशन शो उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका उज्वला गणेश यादव, नगरसेविका कल्पनाताई दिलीप बहिरट, सभागृह नेते गणेश बिडकर यांच्या पत्नी सौ. गौरी गणेश बिडकर, कशिश प्रोडक्शनचे ओनर योगेश पवार सर तसेच सपना भावे उपस्थित होते.
गौरीष फॅशन इन्स्टिट्यूट गेल्या पंधरा वर्षांपासून फॅशन डिझायनिंगचे सरकारमान्य कोर्सेस चालवत असून, येथे विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन दिले जाते. या इन्स्टिट्यूटमधील डिझायनर विद्यार्थ्यांनी शोसाठी इंडो-वेस्टर्न ड्रेसेस तसेच हँड पेंटेड साड्यांची आकर्षक डिझाइन्स सादर केली. सर्व प्रोफेशनल मॉडेल्सकडून रॅम्प वॉक सादर करण्यात आला.
या फॅशन रनवे 2026 मध्ये Kids आणि Adult अशा दोन्ही गटांचा सहभाग पाहायला मिळाला. Kids category मध्ये ३ ते १३ वयोगटातील मुलांनी सहभाग घेतला, तर Miss व Mrs category मध्ये १९ ते ५० वयोगटातील मॉडेल्सनी आत्मविश्वासाने रॅम्प वॉक सादर केला. सहभागी मॉडेल्सना ट्रॉफी, सॅश, सर्टिफिकेट आणि क्राउन देऊन गौरविण्यात आले.
गौरीष फॅशन इन्स्टिट्यूटच्या दोन शाखा पुण्यात सुरू असून त्या रस्ता पेठ, पुणे ११ आणि दिघी, पुणे १५ येथे आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. कोर्सेससाठी प्रवेश घ्यायचा असल्यास गौरीष फॅशन इन्स्टिट्यूटशी संपर्क साधावा.
हा शो गौरीष फॅशन इन्स्टिट्यूट आणि जगदंब असोसिएट्स यांच्या सहयोगाने पार पडला. शोचे ऑर्गनायझर गौरी मोटे व गिरीश मोटे होते, तर को-ऑर्डिनेटर स्वाती केंजळे होत्या. समाजकार्यकर्त्या मृणाल पटवर्धन तसेच ग्रुमिंग मार्गदर्शनासाठी लक्ष्मी पाटील यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमात दोन्ही शाखांतील फॅशन विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
डिझायनर्समध्ये तेजस्वी पोलके, प्रमिला पवार, सोनाली पॅाल, वृशाली घोलप, दिक्षा कोळेकर, अंजली प्रजापती, नुसरत मुजावर, नेहा दुक्रे, निशिगंधा बोकिल, मोनिका परदेशी , मनिषा पवार ,शाहिस्ता तांबोळी, रागिनी बेल्हेकर, कोमल दुधाने अबोली तगडे, फातिमा सय्यद आणि रेनु ओसवाल यांचा समावेश होता.
