करडी पोलिसांची अवैध मोहाफुलांच्या साठवणुकीवर

करडी पोलिसांची अवैध मोहाफुलांच्या साठवणुकीवर मोठी कारवाई; ५६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
भंडारा:
पोलीस स्टेशन करडी अंतर्गत अवैध रित्या मोहाफुलांचा साठा करणाऱ्या इसमावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५६,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, करडी पोलिसांनी मौजा नरसिंहटोला येथे छापा टाकला. यावेळी आरोपी दुर्योधन हंसराज कावळे (वय ३५ वर्ष, रा. नरसिंहटोला, ता. मोहाडी) याच्याकडे अवैध रित्या साठवलेली मोहाफुले आढळून आली.
पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून ७ कापडी पोत्यांमध्ये भरलेली एकूण २८० किलो सडवा मोहाफुले जप्त केली आहेत. बाजारात या मालाची किंमत प्रति किलो २०० रुपये या दराने एकूण ५६,००० रुपये इतकी आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक १५५/२०२६, कलम ६५ (फ) म.दा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
ही यशस्वी कारवाई भंडारा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि पोलीस निरीक्षक नागलोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मडावी व करडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास करडी पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.
भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *