शब्दाला वचन माननारे श्री रणजितबाबू देशमुख*
रणजितबाबू देशमुख हे केवळ नाव नसून महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील एका संघर्षयोद्धाचे प्रतीक आहे.
त्यांच्या जीवनात त्यांना अनेक गोष्टीशी संघर्ष करावा लागला आहे.
त्यांनी जीवनात कधीही स्वतः च्या स्वार्थासाठी तडजोड केली नाही.आपल्या आर्दशाचा, आपल्या नीती मुल्याचा बळी दिला नाही.लोकांच्या भल्यासाठी स्वतः च कितीही मोठं नुकसान समोर दिसत असलं तरी एकदा घेतलेला निर्णय कधीही बदलला नाही.
अनेकदा राजकारणात भूमिका घेताना राजकीय सोय आधी पाहली जाते पण राजकीय परिणामची पर्वा न करता भूमिका घेण्याचे धाडस रणजितबाबू कायम दाखवित आले आहे. एखाद्या भूमिकेचे राजकीय परिणाम काहीही झाले तरी त्यावर ते कायम राहत.
नाही तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहाले असते सर्वश्रुत आहे. म्हणूनच रणजितबाबू चि ओळख म्हणजे जोखीम घेणारे सक्षम नेते अशी होते.मंत्री असताना रणजितबाबूचा वेगळाच दरारा असायचा.प्रशासनावर घट्ट पकड असायची. कोणताही अधिकारी खोटे बोलण्याची किंवा त्यांना चुकीची माहिती देण्याचा प्रश्नच निर्माण होत नसे, कारण त्यांनी जमिनीवर लोकांभिमुख कामे केल्यामुळे खडा न्न खडा त्यांना माहिती असायची.त्या अर्थाने त्यांना दूरदृष्टी आहे, डोक्यात एक निश्चित असे विजन आहे अनेक सामाजिक कार्यात ते अग्रेसर असत.
अशा निडर, स्पष्टवक्तेपणा, आक्रमक शैली असलेल्या महान नेत्याचा जन्म 29 मे 1946 साली झाला.आई माधुरीबाई देशमुख यांची ओळख दानशूर,वडील अरविंदबाबू देशमुख समाजसेवक. रणजितबाबूचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते त्यांनी सुराज्यासाठी आयुष्य वेचले. इंग्रजाच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढणारे हे घराणे त्यामुळे लढाउपणा रणजितबाबू च्या रक्तातच आहे.
वडील अरविंदबाबू नी कोणत्याही पदाचा लोभ केला नाही.त्यांनी अनेक नेते घडविले पण कधी ही कोणतं पद स्वतः कडे घेतले नाही. त्यांनी केवळ दुसर्यांना मोठे करण्याचे, सामाजिक कामे केली ते कुठेही गेले तर स्वतः ते लोकांना त्यांच्या समस्या सतत विचारायचे त्यांचे निवारण करून द्यायचे.त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत रणजितबाबुनी देखील जनसेवा केली. त्यानंतरचि पिढी म्हणजे रणजितबांबूचे सुपुत्र ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कामगिरी दमदार असलेले आमदार आशिषराव देशमुख त्यांनी तर निःस्वार्थ जनसेवेचा वसाच हाती घेतला आहे. हा वसा इथेच थांबलेला नसून नातू हृदय आशिषराव देशमुख डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्यास सज्ज झाला आहे.रणजितबाबू यांनी एकदा कोणाला शब्द दिला की तो शब्द ते कधीच माघारी घेत नसायचे. प्राण जाये पर वचन न जाये हे वाक्य त्यांच्या कारकीर्दीला हुबेहूब जुळत. आजही त्यांना बेशिस्त, खोटेपणा, लोकांची हेळसांड अजिबात खपत नाही काड्या, कपट त्यांनी कधी केले नाही आणि दुसर्यांनी केलेले खपवून घेतले नाही. जात पात भेदभाव कधी ही केला नाही.
वडवीहिरा ग्रा. पं. सदस्य पासून रणजितबाबूची कारकीर्द सुरु झाली. पुढे पंचायत समिती नरखेड चे सर्वात तरुण व उच्चशिक्षित सभापती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.तेव्हा त्यांनी ग्रामीण विकासासोबत ग्रामशिक्षण सुधार अभियानअंतर्गत ग्रामीण शाळा सुधारित केल्या.नंन्तर ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. तेव्हा संपूर्ण राज्यात नागपूर जिल्ह्याला कुटुंब नियोजन कार्यक्रमचा प्रथम पुरस्कार मिळवून दिला. लघुसिंचन योजनाचा विकास केला त्याचा फायदा आजही शेतकऱ्यांना होत आहे.पुढे सावनेर चे आमदार झाले रणजितबाबू च्या काळात सावनेर विधानसभेचा विकास झाला तेवढा या अगोदर झालेला नव्हता. या भागात रस्ते केले. 80 गावे बारमाही रस्त्यानी जोडली. आदासा, वाकी आदि धार्मिक व पर्यटन स्थळाचा विकास घडवून आणला.आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक मंत्रीपदे रणजितबाबू नी भूषवीत असताना त्या खात्याला व राज्यातील लोकांना खरा न्याय दिला. त्याच कामाची पावती म्हूणन आजही राज्यातील कानाकोपऱ्यातील लोक रणजितबाबूच्या कार्याचा गुणगौरव करतात.
रणजितबाबूची खरी कमाई कोणती असेल तर ती त्यांच्या कार्यकर्त्याची फौज आहे. जे कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले ते कायमचे त्यांचेच झाले. काहीही झाले तरी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पोरके होऊ दिले नाही. त्यामुळे त्यांच्या सोबत जनसमुह निर्माण झाला. ते कार्यकर्त्याची कुटुंबासारखी काळजी घेतात.कोणत्याही समस्येत कार्यकर्त्यांनसाठी धावून जात. कार्यकर्त्याना त्यांनी कधी अंतर दिले नाही त्यामुळे कार्यकर्ते आजही पूर्णतः आश्वस्त आहे. आणि आजही संपूर्ण राज्यात त्यांच्या कार्यकर्त्यांच्या फौजी आहे..
विशेष म्हणजे रणजितबाबू देशमुख यांना सभेसाठी कधीही गर्दी जमवावी लागली नाही. लोक स्वतः च त्यांच्या सभेला गर्दी करायचे. अशा लोकांच्या मनातील नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
जिल्हा प्रतिनिधि नितेश गव्हाने, नागपुर.
