दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे संभाजीनगर ते पंढरपूर 340 किलोमीटर

प्रतिनिधी सचिन चौधरी सिटी इंडिया न्युज महाराष्ट्र ब्युरो चीफ छत्रपती संभाजीनगर

 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकलिस्ट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर तर्फे संभाजीनगर ते पंढरपूर 340 किलोमीटर सायकल वारी चे आयोजन करण्यात आले आहे, हे 340 किलोमीटरचे अंतर आज आणि उद्या सर्व 60 सायकलिस्ट मिळून पूर्ण करणार आहे, रविवारी सकाळी पंढरपूर येथे सायकलिस्ट साठी रिंगण सोहळा आयोजित केलेला आहे त्या सोहळ्यासाठी आज सकाळी 6 वाजता ही सायकल टीम रवाना झाली त्यामध्ये सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विजय व्यवहारे, उपाध्यक्ष विजयकुमार कटके, डॉ. प्रशांत महाले डॉ.अरुण गावंडे ,जयंत सांगवीकर काका, राम गोरे, राम सुरवसे ,हितेश वाळले असे अनेक सायकलिस्ट बांधव पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले त्यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रॉक ट्रेकर्स चे ऍडमिन व सायकलिस्ट हसन देवणीकर आणि सिटी इंडिया न्युज चॅनल चे महाराष्ट्र ब्युरो चीफ सचिन चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *