देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे यांची पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती
देगलूर | प्रतिनिधी
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि संघटन कौशल्याची दखल घेत देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे यांची पत्रकार संरक्षण समिती (महाराष्ट्र), नांदेड जिल्हा यांच्या वतीने देगलूर तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र १३ जुलै २०२६ रोजी पत्रकार संरक्षण समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. नियुक्तीपत्रात पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या, अडचणी आणि हक्कांसाठी कार्य करणे, पत्रकारांचे हित जपणे, संघटनेचा तालुकास्तरावर विस्तार करणे, नवोदित पत्रकारांना संघटनेशी जोडणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत समितीची उद्दिष्टे प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गजानन टेकाळे यांच्या नेतृत्वाखाली देगलूर तालुक्यातील पत्रकारांना न्याय, संरक्षण, मार्गदर्शन आणि संघटनात्मक बळ मिळेल. तसेच पत्रकार संरक्षण समितीचे कार्य अधिक प्रभावी व लोकाभिमुख होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून गजानन टेकाळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी गजानन टेकाळे यांनी, “पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून पत्रकार बांधवांचे हक्क, न्याय आणि संरक्षणासाठी संघटना अधिक जोमाने कार्य करेल. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांनाही प्राधान्य दिले जाईल,” असे सांगितले.
देगलूर तालुका पत्रकार संरक्षण समितीची नवीन कार्यकारिणी लवकरच गठित करण्यात येणार असून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
— प्रतिनिधी : श्री. दिपक पाटील बेंम्बरेकरCT इंडिया न्यूज
