कळमेश्वर वनपरिक्षेत्रात अवैध पक्षी शिकारीवर कारवाई; तीन संशयित ताब्यात, ११ तितर पक्षी जप्त*

*कळमेश्वर वनपरिक्षेत्रात अवैध पक्षी शिकारीवर कारवाई; तीन संशयित ताब्यात, ११ तितर पक्षी जप्त*

 

 

कळमेश्वर:

नागपूर वन विभागांतर्गत येणाऱ्या कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील मौजा उबगी येथे वन्यजीवांच्या अवैध शिकारीविरोधात वन विभागाने धडक कारवाई केली आहे. दिनांक १७ जुलै २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेत सर्वे क्रमांक १४२ मध्ये विशेष मोहीम राबवून तीन संशयित व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

संशयितांच्या ताब्यातून ११ जिवंत तितर पक्षी, २ मृत बटेर पक्षी आणि शिकार करण्यासाठी वापरण्यात येणारी २ जाळी जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील कायदेशीर तरतुदींनुसार वन अपराध नोंदवून पुढील सखोल तपास सुरू करण्यात आला असून, जप्त जिवंत पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कार्यवाही केली जात आहे.

सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पी. एल. साठवणे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक श्री. के. एस. वाटकर, श्री. पी. व्ही. घुगल तसेच वनरक्षक श्री. डी. के. पडवाल, श्री. एम. सी. बोपटे, श्री. आर. एस. हुलकाने, श्री. ए. पी. मोडक व वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. परिसरात वन्यजीवांची शिकार किंवा तस्करी आढळल्यास तात्काळ वन कार्यालयाशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन वन विभागाने जनतेला केले आहे.

 

 

विशेष प्रतिनिधी चंदू मडावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *