*अल्पवयीनांकडून वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासाठी चंद्रपूर पोलिसांचे जनजागृती अभियान*
चंद्रपूर वाहतूक शाखेच्या वतीने अल्पवयीन मुला-मुलींनी वाहन चालवू नये यासाठी विशेष जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत खेत्री विद्यालय, विद्या विहार स्कूल, माउंट कार्मेल स्कूल आणि भवानजी विद्यालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थी व पालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
यावेळी *पोलीस निरीक्षक सूर्यवंशी साहेब व पोलीस अंमलदार अर्जुन चव्हाण व पोलीस अंमलदार ऋषिकेश तिवारी (वाहतूक शाखा, चंद्रपूर)*
यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अल्पवयीन मुला-मुलींनी कोणत्याही परिस्थितीत दुचाकी किंवा इतर वाहन चालवू नये. जर अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविताना आढळ्यास, संबंधित पालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.
यामध्ये तीन महिन्यांपर्यंत कारावास तसेच ₹25,000 दंड अशी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये व विद्यार्थ्यांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.
या जनजागृती अभियानाला सर्व शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी चंद्रपूर वाहतूक पोलिसांचे हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
*प्रतिनिधी सचिन घारपुरे*
