गोंदियात २ लाख रुपयांचा गांजा जप्त; “स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई”
गोंदिया: स्थानिक गुन्हे शाखेने रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत गड्डाटोली ओव्हरब्रिजखाली सापळा रचून एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून २.०५ किलो बेकायदेशीर गांजा आणि मोबाईलसह एकूण २,१०,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपीचे नाव: मनीष दीपक रामटेके (वय २७ वर्षे, रा. गांधी वार्ड, गोंदिया). २ लाख ५ हजार रुपये किमतीचा २.०५ किलो गांजा, १० हजार रुपयांचा अँड्रॉइड मोबाईल आणि ३०० रुपयांची टिनची पेटी.
कारवाईचे ठिकाण: गड्डाटोली ओव्हरब्रिजखाली, गोंदिया. आरोपीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी महादेव शेंडे
