मिटमिट्यातील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर
प.पू. माई महाराज संस्थान ट्रस्ट कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर, मिटमिटा येथे उद्या बुधवार, २९ रोजी सकाळी ११.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात अभिषेक, गुरुमंत्र, पाद्यपूजा, आरती, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक, भक्तांनी या आनंदमय उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
