पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या सूचनेनंतर दत्तनगर च्या नागरिकांना मिळाले रोहित्र*

*पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या सूचनेनंतर दत्तनगर च्या नागरिकांना मिळाले रोहित्र*

 

*सुट्टीच्या दिवशी रोहित्र मिळाल्याने नागरिकांनी व्यक्त केला आनंद*

 

प्रतिनिधी,मनोज टाक बोरी

 

*बोरी-* येथील दत्त नगर मधील नागरिक विद्युत रोहित्र जळाल्याने दोन दिवसापासून अंधारात होते. पालकमंत्री सौ. मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांनी कार्यकर्ते व नागरिकांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन संबंधित विद्युत कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर रविवार दिनांक २ ऑगस्ट रोजी विजेचे आगमन झाल्याने दत्तनगर मधील रहिवाशी नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास या रोहित्रा वर विजेचा दाब आल्याने ते जळून गेल्याची घटना घडली. यामुळे या भागातील नागरिकांना दोन दिवस अंधारात काढावे लागले. या भागातील तानाजी चौधरी व इतर नागरिकांनी मिळून याकामी पुढाकार घेतला. सतीशराव चौधरी, ओमकार चौधरी व शिवाजीराव कदम यांची या सर्वांनी प्रत्यक्ष भेट घेतली.तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांच्याशी फोनवर चर्चा करण्यात आली. पालकमंत्र्यांनी याची दखल घेवून महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. रविवार दि.२ ऑगस्ट रोजी रात्री रोहित्र बसविण्यात आले. विद्युत कर्मचारी आर.डी. दांडगे, ए.पी. कानडे,युनुस शेख, उत्तम शेवाळे, शेख सिद्दीक यांनी हे काम पूर्ण केले.या भागातील वीज आल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *