वसमत येथे उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

वसमत येथे उत्साहात साजरा झाला जागतिक आदिवासी दिन

 

वसमत : ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त वसमत शहरातील बिरसा मुंडा चौक येथे आद्यक्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

यावेळी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भगवान बिरसा मुंडा यांच्या शौर्य, त्याग व संघर्षाचे स्मरण करून आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, अस्मिता आणि हक्क जपण्याचा संकल्प करण्यात आला.

 

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व सांगत आदिवासी समाजाने शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन केले. तसेच आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 

यावेळी “जय बिरसा! जय जोहार! जय आदिवासी!” अशा घोषणांनी बिरसा मुंडा चौक परिसर दुमदुमून गेला.

 

कार्यक्रमास आदिवासी युवक, महिला, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक तसेच वसमत तालुक्यातील आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये काळुराम कुरुडे, शेषराव बळवंते, तुकाराम बेले, सूर्यकांत कोठुळे, डॉ. चंद्रशेखर खोकले, कोंडबा पानबुडे,पंडित खोकले,बळीराम गिऱ्हे, अशोक वंजारे, शिवाजी कुरुडे, ग्यानोजी खरोडे, पांडुरंग गारोळे, हरिदास वंजारे, गुणाजी धुमाळे, शिवराम खुडे, सुभाष वागतकर, सुनील कऱ्हाळे, घोकसे, खुळे, गारोळे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.

 

छाया नागेश चव्हाण

प्रतिनिधी सचिन घारपुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *