क्रिकेट परिवाराकडून दिवंगत जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या कुटुंबाला २ लाख १५ हजारांची मदत

क्रिकेट परिवाराकडून दिवंगत जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या कुटुंबाला २ लाख १५ हजारांची मदत

 

अर्धापूर : क्रिकेटच्या मैदानावर एकत्र आलेल्या मित्रत्वाच्या नात्याने माणुसकीचा आदर्श निर्माण करत, क्रिकेट परिवाराच्या वतीने दिवंगत जॉनी भाऊ अर्धापूरकर यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.

 

जॉनी भाऊ अर्धापूरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटात आधार मिळावा या उद्देशाने क्रिकेट परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र येत एकूण २ लाख १५ हजार २५८ रुपये जमा केले.

 

जमा झालेल्या रकमेतून १५ हजार २५८ रुपये कुटुंबाच्या तातडीच्या गरजांसाठी मुलाच्या हातात देण्यात आले. तसेच ५० हजार रुपये परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या धर्मपत्नीच्या खात्यावर जमा करण्यात आले. उर्वरित १ लाख ५० हजार रुपये त्यांच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यात लंपसम स्वरूपात जमा करण्यात येत आहेत.

 

या उपक्रमातून क्रिकेट खेळाच्या माध्यमातून निर्माण झालेली मैत्री, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर प्रत्यय आला आहे. दुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे क्रिकेट परिवाराने या मदतीतून दाखवून दिले.

 

ही माहिती बालाजी पाटील सुगावकर यांनी दिली.

 

तालुका प्रतिनिधी : ओमकार पोतलवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *