सावळदबारा येथील चक्रधर स्वामी मंदिरासाठी २ कोटी ४५ लाख रुपयांची कामे मंजूर — इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्याला यश

सावळदबारा येथील चक्रधर स्वामी मंदिरासाठी २ कोटी ४५ लाख रुपयांची कामे मंजूर — इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्याला यश

सोयगाव तालुक्यातील संतोष गर्दे

सावळदबारा येथील श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांची विकासकामांना मंजुरी मिळाली आहे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री ना. अतुलजी सावे तसेच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सहकार्याने ही कामे मंजूर झाली असून, यासाठी इद्रिस मुलतानी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

चक्रधर स्वामी मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी इद्रिस मुलतानी यांनी विशेष प्रयत्न व सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून मंदिराला ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध कामांसाठी त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू ठेवला.

मंदिराच्या विकासासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये सभागृह बांधकामासाठी 1 कोटी रुपये, तर रस्ता, स्वच्छतागृह व प्रसाद व्यवस्थेसाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच मंदिर संरक्षण भिंतीसाठी 50 लाख व पथदिव्या साठी 25 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

या निधीतून मंदिर परिसरात भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण होणार असून, रस्ते, स्वच्छतागृह, प्रसाद व्यवस्था आणि सभागृह यामुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे. मंदिराच्या विकासामुळे सावळदबारा परिसराच्या धार्मिक व पर्यटन विकासालाही चालना मिळणार आहे.

फर्दापूर जिल्हा परिषद गटातील या विविध विकासकामांसाठी इद्रिस मुलतानी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, ना. जयकुमार गोरे, ना. अतुलजी सावे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे विकासकामांना मोठी चालना मिळाली आहे.

फर्दापूर जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या या निधीमुळे धार्मिक स्थळांचा विकास, मूलभूत सुविधा आणि गावातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, पुढील काळातही विकासकामांसाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची माहिती इद्रिस मुलतानी यांनी दिली.

 

प्रतिक्रिया.

राज्यमंत्री दर्जा इद्रिस मुलतानी याचे आभार.

सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील श्री चक्रधर स्वामी मंदिराला ‘ब’ दर्जा मिळावा, यासाठी भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. मंदिराला ‘ब’ दर्जा मिळाला आहेत . आता श्री चक्रधर स्वामी मंदिराच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात सुमारे २ कोटी ४५ लाख रुपयांची विकासकामांना मंजुरी मिळाली आहे त्यामुळे सावळदबारा परिसरातील ग्रामस्थ व भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे भाजपचे अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राज्य मंत्री दर्जा इद्रिस मुलतानी यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे आभार

— गुलाबराव पाटील कोलते भाजप सोयगाव तालुका सरचिटणीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *