खुबगाव येथे दारूबंदी महिला मंडळाची स्थापना

खुबगाव येथे दारूबंदी महिला मंडळाची स्थापना

 

खुबगाव : ग्रामपंचायत खुबगावच्या वतीने गावामध्ये दारूबंदी करण्याच्या उद्देशाने तसेच पोलीस पाटील यांच्या सहकार्याने दारूबंदी महिला मंडळाची स्थापना करण्यात आली. मा. ठाणेदार डेहनकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्थापना करण्यात आली असून, ग्रामसभा ठराव क्रमांक ४/१ नुसार दारूबंदी महिला मंडळ गठित करण्यात आले आहे.

 

गावातील दारूविक्री व व्यसनाला आळा घालून गावामध्ये शांततामय व व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामपंचायत, पोलीस पाटील, महिला मंडळ तसेच ग्रामस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.

 

दारूबंदीच्या या उपक्रमाला गावातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, गाव व्यसनमुक्त करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व दारूबंदी महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. सीटी इंडीया न्युज अमरावती जिल्हा प्रतिनिधी रविन्द्र खेडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *