न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील महिला संघाने मैदानी डी झोन

*” न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली येथील महिला संघाने मैदानी डी झोन 4*400 मी. स्पर्धेत कांस्यपदक , लांब उडी व उंच उडी मध्ये रौप्य पदक पटकाविले.”*

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

 

हिंगोली ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड द्वारा दि.२८/०९/२०२६ रोजी श्री शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे आयोजित हिंगोली जिल्हा ‘डी’ झोन मैदानी महिला स्पर्धेत न्यू माॅडेल डिग्री काॅलेज,हिंगोली येथील महिला संघ सहभागी झाला होता.या महिला मैदानी स्पर्धा संघांमध्ये वैष्णवी कोपनर, मनिषा क-हाळे, गायत्री बनसोडे, संतोषी जिरवणकर यांनी 4*400 मी.रिले स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. कु.संतोषी जिरवणकर हिने लांब उडी व उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक मिळविले.विजयी खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल मा.प्राचार्य डॉ.एन.एस. सोळंके यांनी महाविद्यालयात पुष्पगुच्छ व पदक देऊन सत्कार केला.तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी क्रिडा मार्गदर्शन डॉ काळबांडे एस.आर.,डॉ.गलंडे एल.डी.,प्रा.चव्हाण बी.बी., डॉ.वाय.एम.काशिदे,प्रा.कांबळे व्हि. आर., प्रा.किरवले यु.डी., प्रा.शिर्के एस.पी., श्री अंकुशकर, श्री अशोक क-हाळे यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *