नरसी नामदेव येथे २४ व २५ ऑक्टोबरला तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन
नामदेव–चोखामेळा अनुबंधाचा जागर; परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलने, कीर्तन आणि ज्येष्ठ वारकरी सन्मानाचे आयोजन
हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे
हिंगोली : संत नामदेव महाराजांची जन्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र नरसी नामदेव, जि. हिंगोली येथे शनिवार, दि. २४ व रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी तिसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संत चोखामेळा अध्यासन केंद्र, आळंदी, पुणे; वृंदावन फाऊंडेशन, पुणे आणि श्री संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे अभ्यासक, संशोधक व लेखक ह.भ.प. प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये असणार आहेत.
“नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥” हे संमेलनाचे विचारसूत्र असून, संत नामदेव महाराज आणि संत चोखामेळा व त्यांच्या परिवारातील भक्ती, मैत्री, कौटुंबिक स्नेह आणि सामाजिक सन्मानाचे अनुबंध विविध सत्रांतून उलगडले जाणार आहेत. दोन दिवसांच्या या संमेलनात ग्रंथदिंडी, विषयाधारित परिसंवाद, कथाकथन, निमंत्रितांची कविसंमेलने, प्रकट मुलाखत, अभंगवाणी, हरिकीर्तन आणि ज्येष्ठ वारकरी बंधू-भगिनींचा सन्मान असे कार्यक्रम होणार आहेत.
ग्रंथदिंडीने संमेलनाचा प्रारंभ
शनिवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता औंढा नागनाथ येथील संतशिरोमणी विसोबा खेचर समाधी मंदिरापासून ग्रंथदिंडीला प्रारंभ होईल. भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज मंदिर, श्रीक्षेत्र नरसी नामदेव येथे ही ग्रंथदिंडी पोहोचेल. संतविचारांचा जागर करीत संमेलनाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
सकाळी १० वाजता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा संत चोखामेळा जन्मोत्सव सोहळ्याचे संकल्पक हर्षवर्धनदादा सपकाळ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. पंढरपूर येथील विश्वपुण्यधामपीठाचे महंत गुरुवर्य ह.भ.प. भारत महाराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. संमेलनाध्यक्ष ह.भ.प. प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये यांच्या उपस्थितीत होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास माजी सनदी अधिकारी व संतसाहित्य अभ्यासक इंद्रजीत काका देशमुख तसेच संत चोखामेळा अध्यासन केंद्र व संत चोखामेळा आरोग्य केंद्राचे संस्थापक, संतसाहित्य अभ्यासक व संशोधक सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन सोहळ्यास श्री संत नामदेव महाराज संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत भुजबळ, आमदार तथा संस्थानचे विश्वस्त तानाजी मुटकुळे, विश्वस्त मनोजदादा आखरे, पैठण येथे झालेल्या दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, विठ्ठल पावडे, सतिश पाचपुते, निलेशराव गद्रे, नरसी नामदेवचे सरपंच आणि संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. रामदास चौरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. गणेश येवले सूत्रसंचालन करतील, तर प्रा. राम तोडकर आभार मानतील.
नामदेव–चोखामेळा भक्ती अनुबंधावर परिसंवाद
पहिल्या दिवशी दुपारी १.३० वाजता भोजनानंतर दुपारी २ वाजता “संत नामदेव महाराज आणि संत चोखामेळा व परिवार यांच्यातील अनुबंध–भक्ती” या विषयावर परिसंवाद होईल. परभणीचे नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात डॉ. दत्तात्रय डुंबरे, डॉ. मुरहरी केळे, ह.भ.प. अभय महाराज जगताप, डॉ. ओम श्री दत्तोपासक आणि डॉ. पुरुषोत्तम जुन्ने सहभागी होतील. डॉ. सुरेंद्र साहू सूत्रसंचालन करतील, तर प्रा. धनंजय कुलकर्णी आभार मानतील.
दुपारी ३ वाजता डॉ. भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचे सत्र होईल. यामध्ये शिवदास पोटे, प्रा. मुरलीधर जायभाये, ह.भ.प. विजय शिंदे, प्रा. स्वाती कान्हेगावकर, कलानंद जाधव, गोडाती काळे, बबन महामुने आणि जी. जी. कांबळे कथाकथन करतील. प्रा. संजय फड सूत्रसंचालन करतील, तर विजय राठोड आभार मानतील.
दुपारी ४ वाजता डॉ. राधिका देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन रंगणार आहे. डॉ. विजयकुमार कस्तुरे, शिवनंदा माळी, कविता पुदाले, पूजा माळी, बाळ पाटील, लक्ष्मण हेंबाडे, छायाताई बेले, डॉ. भारत सातपुते, राजेश रेवले, बंडोपंत बोडेकर, एम. ए. रहीम, सुनील बावणे, प्रदीप देशमुख, प्रशांत भंडारे, दिलीप झुंगरे, गिरिधर इंगोले, गौसपाक मुलानी, मोहिद्दीन मुलानी, अमीर पटेल, रामप्रभू माने, जयराज शेंबडे, जनाबापू पुणेकर, कॅ. विजय सूर्यवंशी, साईनाथ रहाटकर, डी. एन. मोरे, दत्ता वालेकर, अशोक गुट्टे, लक्ष्मण गायकवाड, ज्योती कदम, निलेशकुमार वाणी, रसिका विडोळकर, डॉ. गायत्री दरगू, गौरी गुंडेवार, संगीता चौधरी, पारिजात देशमुख, दत्ताहरी कदम, लिंबाजी थोरे, डॉ. निरंजन माधव, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रभाकर सोमकुंवर, प्रा. गणेश मोताळे, प्रवीण बागडे, संतोष नारायणकर, शिवाजी मरगीळ, डॉ. रोहिणी पांडे, स्वाती भद्रे, अक्षरा खेडकर, अनंत कराड, डॉ. डी. व्ही. खरात आणि हनुमंत घाडगे सहभागी होतील. जगदीप वनशिव निवेदन करतील, तर रसिका विडोळकर आभार मानतील.
रात्री ७ ते ९ या वेळेत सोनपेठ येथील ह.भ.प. सोमनाथ महाराज बदाले यांचे हरिकीर्तन होईल. ते सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’चे विजेते आहेत. रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुसऱ्या दिवशी अभंगवाणी आणि वैचारिक मंथन
रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता ‘संत नामदेव–संत चोखोबा चळवळ / अभंगवाणी’ या कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाला प्रारंभ होईल. नरसी नामदेव, पहेणी, वरुड काजी, वरुड आजी, सरकळी, गिलोरी, कडती, हनवतखेडा, चांगेफळ, काळकोंडी, घोटा, सवड, केसापूर आणि गोजेगाव आदी गावांतील भजनी मंडळी सहभागी होणार आहेत.
सकाळी १०.३० वाजता “संत नामदेव महाराज व संत चोखामेळा महाराज व परिवार यांच्यातील अनुबंध–मित्रत्व, कौटुंबिक स्नेह आणि सामाजिक सन्मान” या विषयावर परिसंवाद होईल. सिंदखेड राजा येथील ह.भ.प. ज्योतीताई जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात सांगोला येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर, पुण्याचे ह.भ.प. सचिन महाराज पवार, छत्रपती संभाजीनगरचे डॉ. सर्जेराव जिगे, मुंबईचे ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोन्नर आणि हिंगोलीचे अशोक अर्धापुरकर सहभागी होतील. प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत सूत्रसंचालन करतील, तर प्रा. डॉ. ज्ञानेश्वर गाडे आभार मानतील.
दुपारी १२ वाजता युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी प्रा. डॉ. वि. रा. राठोड यांची प्रकट मुलाखत होईल. हिंगोलीचे अण्णा जगताप त्यांच्याशी संवाद साधतील. व्ही. डी. देशमुख सूत्रसंचालन करतील, तर प्रा. पवन वसेकर आभार मानतील.
दुपारी १ वाजता रतन आडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. शिवाजी कऱ्हाळे, फूलचंद नागटिळक, डॉ. शिवराज नाकाडे, डॉ. गोविंद भालेराव, कलानंद जाधव, सिंधुताई दहिफळे, मीरा कदम, प्रा. राजाराम बनसकर, संतोष नारायणकर, अश्विनी देशमुख, गोडाती काळे, ज्ञानदा चौधरी, केदार शेवाळकर, मनोहर दिपके, राजकुमार मोरगे, डॉ. सुधीर वाघ, डॉ. श्रीराम कऱ्हाळे, डॉ. संगीता अवचार, नामदेव वाबळे, शिवशरण रटकलकर, पांडुरंग गिरी, स्वप्नील मुळे, खुशी वानखेडे, नामदेव दिपके, शिवाजी घुगे, जब्बार पटेल, प्रा. गोविंद लहाने, के. पी. बिराजदार, गणपत म. माखणे, डॉ. संगीता घुगे, डॉ. उर्मिला चाकूरकर, डॉ. घ. ना. पांचाळ, अनिल उदावंत, सविता देशमुख, किसन उगले, नंदकुमार बालुरे, उन्मेष शेकडे, राजपाल पाटील आणि तुळशीदास बिरादार सहभागी होतील. प्रा. पांडुरंग काळे सूत्रसंचालन करतील, तर शिवाजी कऱ्हाळे आभार मानतील. दुपारी २.३० ते ३ या वेळेत भोजन अवकाश असेल.
‘गजर भक्तीचा–सन्मान श्रद्धेचा’
दुपारी ३ वाजता ‘गजर भक्तीचा–सन्मान श्रद्धेचा’ या सोहळ्यात हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ वारकरी बंधू-भगिनींचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी व माजी सनदी अधिकारी श्रीकांतजी देशमुख यांच्या हस्ते आणि शेषाद्रीअण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल. संतोष तांबे, महारुद्र जाधव आणि प्रा. सोमनाथ लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ह.भ.प. विठ्ठल महाराज वामन सूत्रसंचालन करतील, तर प्रा. डॉ. राजेश गोरे आभार मानतील.
मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप
रविवारी दुपारी ४ वाजता लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचा समारोप होईल. संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये, ज्येष्ठ साहित्यिक, कवी व संतसाहित्य अभ्यासक प्रा. इंद्रजित भालेराव आणि श्री संत नामदेव महाराज संस्थानचे विश्वस्त आमदार गजाननराव घुगे उपस्थित राहणार आहेत. संतोष तांबे, प्रा. कमलेशजी खिलारे आणि प्रा. सुरेखा भालेराव नागटिळक यांची प्रमुख उपस्थिती असेल. सचिन पाटील समारोपाचे मनोगत व्यक्त करतील. प्रा. डॉ. किशोर इंगोले सूत्रसंचालन करतील, तर अश्विनी आसेगावकर आभार मानतील.
“माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधी विघ्न पडो नेदी ॥” या संतवचनातील स्नेहभाव जपत संत नामदेव–संत चोखामेळा अनुबंधाचे चिंतन आणि संतसाहित्यातील समता, बंधुता व मानवतेच्या विचारांचा प्रसार या संमेलनातून होणार आहे. वारकरी, संतसाहित्याचे अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, कवी, विद्यार्थी आणि साहित्यप्रेमींनी संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
