दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विधवा, दिव्यांग तसेच गरजू महिलांची दिवाळी आनंदात साजरी

सावळदबारा (ता. सोयगाव) दि.5, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर विधवा, दिव्यांग तसेच गरजू महिलांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने तालुका शिवसेनेच्या वतीने सावळदबारा येथे दिवाळी शिधा वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सिल्लोडचे नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गरजू महिलांना किराणा साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.

 

यावेळी मार्गदर्शन करताना अब्दुल समीर अ. सत्तार म्हणाले की, सिल्लोड–सोयगाव तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असली तरी शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा मूलमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेला जात आहे.

 

शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या सहकार्याने आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील गरजू घटकांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान याप्रसंगी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांना दीपावली पाडवा आणि भाऊबीज निमित्त शुभेच्छा दिल्या.

 

याप्रसंगी सिल्लोडचे उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, युवा सेनेचे अक्षय मगर, राजूबाबा काळे, तालुकाप्रमुख धरमसिंग चव्हाण, शिवाप्पा चोपडे, कृउबा समितीचे संचालक दारासिंग चव्हाण, लुकमान शेठ, सांडू तडवी, पंडित सरपंच, गुलाब राणा, स्वानंद पाटील, मोहन सुरडकर, कान्हिराम जाधव, अर्जुन साबळे, विश्वनाथ पाटील, रमेश इंगळे, गणेश खैरे, महेश राठोड, अनिल पाटील, रज्जाक तडवी, मो. आरिफ शेख, मुकेश चव्हाण, राधेश्याम जाधव, विनोद जाधव, अतुल इंगळे, ईश्वर कोढपे, कैलास मुळे, गंगाधर सदाशिवे, नितीन शेळके, आंभेकर सर, राहुल हेल्लोडे, ईश्वर शेळके, किसन सूर्यवंशी व विठ्ठल कोळी आदिंसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व लाभार्थ्यांची उपस्थिती होती. सोयगाव तालुका प्रतिनिधी संतोष गर्दे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *