महागांव शहरात दारू विक्रीविरोधात संताप अनेक स्त्रियांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ

महागांव शहरात दारू विक्रीविरोधात संताप अनेक स्त्रियांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ

 

 

 

एस के शब्बीर यवतमाळ

 

 

महागाव शहरात सुरू असलेल्या देशी दारूच्या दुकानासह बैठक वाईन बार व देशी दारू च्या दुकाना विरोधात नागरिकांचा तीव्र संताप होत असून या महागाव शहरात पुसद रोड पासून मुख्य बाजारपेठ कडे जाण्याचा मार्ग व याच मुख्य बाजारपेठ मार्गावर जिल्हा परिषद शाळा. कन्या शाळा सराफा लाईन स्टेट बँक पंचायत समिती कार्यालय शासकीय मुख्य मार्गावरील महागाव तालुक्यातील 110 गावांची जनसंख्या रहदारी दररोज करतात रहदारी या वसंतराव नाईक चौकातून शाळेकरीता मुले मुली रहदारी करताना काही दारुड्याकडून दररोज वाद निर्माण झाल्याचे समोर आढळून येत आहे.या विरोधात महिलांनी उभारलेले आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांनी आणि महिलांनी दारू विक्रीमुळे परिसरातील वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष रंजना दीपक आडे यांनीही नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून दारू विक्री थांबवण्यासाठी ठोस भूमिका घेतली आहे. आडवी बाटली उभी बाटली करण्याचा हा प्रकार शहराच्या सामाजिक वातावरणाला घातक आहे. महिलांच्या सुरक्षिततेसह कुटुंबांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या या दारू विक्रीला महागावमध्ये स्थान नसावे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.या आंदोलनात जयश्री संजय नरवाडे यांनी पुढाकार घेत महिलांना एकत्र केले असून शहरातील अनेक महिला व पुरुषांनीही या लढ्याला पाठिंबा दिला आहे. परिसरात सुरू असलेले देशी दारूचे दुकान आणि बैठक वाईन बार त्वरित हटवावे, अशी महिलांची जोरदार मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.या पूर्वी

महिलांच्या सह्यांसह अधिकृत तक्रार प्रशासनाकडे देण्यात आली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सह्यांची पडताळणी करण्यासाठी ७ तारखेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत नागरिकांच्या मागण्यांवर चर्चा होणार असून दारू विक्रीबाबत पुढील निर्णय अपेक्षित आहे.नगराध्यक्ष रंजना आडे यांनी शहरातील सर्व महिलांना व सर्व जेनतेनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. महागाव शहर दारूमुक्त व्हावे, कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दारू विक्रीला आळा बसावा यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले.

महिलांच्या पुढाकारामुळे हे आंदोलन आता लोकचळवळ बनत असून देशी दारूचे दुकान आणि बैठक वाईन बार हटविण्याची मागणी दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. नागरिकांच्या व महिलाच्या या ठाम भूमिकेमुळे प्रशासनानेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *