घानमुख ग्रा. पं भ्रष्टाचारच्या दोषींवर कारवाईच्या मागणीसाठी राम जाधव यांचे उद्यापासून आमरण उपोषण
यवतमाळ एस के शब्बीर
घाणमुख ग्रामपंचायतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त वातावरण निर्माण झाले असून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते राम जाधव हे उद्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांच्यासह इतर चार जण दोषी आढळल्याचे समोर आले आहे. तरीसुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. याच प्रकरणात दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असताना ही प्रवीण सलामे, सुलोचना इंगळे आणि रवी दिलीप चवरे यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आलेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राम जाधव यांनी या प्रकरणात शासनाच्या भूमिकेवर महागाव तालुक्यात सर्वात मोठा प्रश्न उपस्थित ठरत आहे या . तसेच या प्रकरणात दुजाभाव होत असून हा अन्याय जनतेला मान्य नसल्याची भूमिका नागरिकांनी मांडली आहे.उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या.कनिष्ठ अभियंता प्रवीण सलामे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी.प्रवीण सलामे व इतर चार दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत. जिल्हा परिषद यवतमाळ व शाखा अभियंता महागाव या भ्रष्टाचारातून झालेली संपूर्ण रक्कम शासनाकडे वसूल करून जमा करण्यात यावी.या प्रकरणाची निष्पक्ष, सखोल व पारदर्शक चौकशी पूर्ण झाली असल्यास कारवाई करण्यात विलंब करू नये.राम जाधव यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले , जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील. भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देणे तात्काळ बंद करावे, अन्यथा जनतेचा तीव्र रोष उसळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील.दबाव आणि धमक्यांचा आरोप दरम्यान, राम जाधव यांनीच हा भ्रष्टाचार उघडकीस आणल्याचे सांगितले जात असून या प्रकरणानंतर त्यांच्यावर काही अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जात तसेच धमक्या सुद्धा दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र कोणत्याही दबावाला बळी न पडता लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार असल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.गावाच्या विकासाला भ्रष्टाचारामुळे महागाव तालुक्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाच्या हितासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी ही लढाई लोकशाही मार्गाने प्रामाणिकपणे लढत राहणार,” असे राम जाधव यांनी सांगितले. न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही” अशी ठाम भूमिका घेत उद्यापासून पंचायत समिती कार्यालयासमोर हे आमरण उपोषण सुरू होणार असून या आंदोलनाकडे महागाव तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
