गुन्हेगारी प्रवृत्त करणारे पाच आरोपींवर(MACOCA)
नागपुर:-
नागपूर ग्रामीण पोलिसांनी वर्चस्व निर्माण करून दहशत पसरविणाऱ्या 5 आरोपीतांच्या आंतरराज्यीय टोळी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (MCOCA) लावला आहे
पोलीस स्टेशन देवलापार:-माननीय श्री हर्ष ए. पोद्दार, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा आणि श्री अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांचे मार्गदर्शनात देवलापर पोलिसांनी वर्चस्व निर्माण करून दहशत पसरविणाऱ्या आंतरराज्यीयआरोपी त्यांच्या टोळीप्रमुख आरोपी नामे 1)दाने शब्द वय 25 वर्ष ,राहणार घर क्रमांक 27, सुभाषचंद्र बोस वार्ड,न्यू आनंद नगर ,रझा चौक , थाना हनुमानताल , जबलपूर राज्य मध्य प्रदेश आणि चार टोळी सदस्य अशा एकूण पाच आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 लावला आहे
दिनांक 4/3/2026 रोजी देवलापार पोलिसांनी गोपनीय माहितीवरून चार चाकी वाहन क्रमांक एम एम पी 28 सी बी 3008 यामध्ये दाणे शब्द आफिदी याला त्याचे साथीदारांना देशी बनावटीचे पिस्टल (माउजर) आणि दोन जिवंत काडतुसांसह पकडले होते. नमूद प्रकरणी आरोपींविरुद्ध पोस्ट देवलापार येथे कलम 3/25 सहस्त्र अधिनियम सह कलम 3( 5) भान्यासं, कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी साखळी पुरावे जोडत गुन्ह्याच्या तपास केला असता असे निदर्शनास आले की, सदर गुन्हा हा संघटितरित्या केलेला आहे
नमो संगतीत गुन्हेगारी तोडीच्या प्रमुख दाने अब्दुल गफूरआफिदी आणि त्याची साथीदार यांची आंतरराज्यीय टोळी असूननमूद टोळी प्रमुख व टोळीतीलसदस्य हे आर्थिक फायद्यासाठी तसेच परिसरात कुत्र्यांची टोळीची दहशतव व वर्चस्व पसरविण्यासाठी स्वतंत्रपणे व एकत्रितपणे नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशन देवलापा तसेच नागपूर येथील पोलीस स्टेशन कळमना,तहसील तसेच मध्य प्रदेश राज्यातील पोलीस स्टेशन गोहालपूर, हनुमानताल,आधारताल, माढोताल, बेलबाघ व पनागर हद्दीत संघटितपणे खुनाच्या प्रयत्न, प्राण घातक शस्त्र बाळगणे, गैर कायद्याची मंडळी जमविणे, गंभीर दुखापत, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, अवैधर एकदा अग्निशस्त्र/देशी पिक्चर ताब्यात बाळगून विक्री करणे यासारखे गुन्हे केले आहे. तसेच तोडी प्रमुखांनी आपले टोळी मध्ये नवनवीन सदस्यांना घेऊन यापूर्वीसुद्धा अनेक गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. आरोपितांचे गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता पोलिसांनी वेळोवेळी त्याचेवर गुन्हे नोंद करून प्रतिबंधक कार्यवाही सुद्धा केली आहे परंतु आरोपी त्यांनी त्यांची गुन्हेगारी गतिविधि निरंतर सुरूच ठेवली.
देवलापर पोलिसांनी नमूद पाच आरोपींच्या थोडी विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999(MCOCA) अन्वये प्रस्ताव तयार करून माननीय पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्फतीने माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिषद नागपूर यांचे कडे सादर केला असता माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिषद नागपूर यांच्या कार्यालयाकडून सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999(MCOCA) अन्वये कलम वाढ करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार
