आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा

 

 

हिंगोली प्रतिनिधी शिवाजी कऱ्हाळे

हिंगोली दि. 24 : कामाची पावती म्हणून ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातोय याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी आज येथे केले.

येथील षटकोणी सभागृहात ग्रामपंचायत विभागामार्फत उत्कृष्ट व आदर्श कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांचा सन्मान सोहळा मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड उपशिक्षणाधिकारी संदिपकुमार सोनटक्के यांच्यासह गटविकास अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

ग्रामसेवकांनी गाव पातळीवर चांगल्या सेवा दिल्यास वेळेत लोकांची कामे पूर्ण केल्यास लोकांच्या तक्रारी आपोआप कमी होतात असे श्री. गायकवाड यावेळी म्हणाले. ग्रामपंचायत पातळीवर काम करत असताना आपण आपले काम प्रामाणिकपणे व लोकांना समाधान मिळेल, असे काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. वंदे मातरम गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाले असून 23 मार्चपासून वंदे मातरम गीताबाबत ग्रामपंचायत,शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यात येत आहे. ग्राम स्तरावरील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी व्हाट्सअप चॅटबोटसह अंतर विभागीय समन्वय पोर्टल विकसित करण्यात आले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी सांगितले.

हिंगोली मध्ये हळदीच्या उत्पादनाला बचत गटाच्या माध्यमातून पिवळे सोनं म्हणून प्रोडक्शन केले आहे.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर मांडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने यांनीही समयोचित भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत पातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामसेवक यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी लक्ष्मीकांत क्षीरसागर व दत्ता वाघ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *